बैलपोळा भारतीय कृषी संस्कृतीतील अब्राह्मणी सण. बैलपोळा 2024
बैलपोळा हा भारतीय कृषी संस्कृतीतील अब्राह्मणी सण. हा सण सबंध शेतकरी वर्गामध्ये नव्हे तर सर्वांमध्येच साजरा केला जातो. साहजिकच ह्या सणाच्या निमित्ताने काही प्रश्न पडतात.काय आहे या सणामागील नेणीव? या सणामागे काही भौतिक वास्तवाचे कंगोरे आहेत का? अजूनही शेतकरी वर्गात हा सण सर्वात लोकप्रिय असण्याचे काय कारण आहे?
इ. सन. पूर्व 2800 च्या दरम्यान लाकडी नांगराचा शोध लागल्याचे काही अर्कियोलोजिकल पुराव्यावरून समोर आलेले आहे. अशा ह्या नांगराच्या शोधाचा पहिला पुरावा हा कालिबंगण येथील नांगरलेल्या शेतीचा असल्याचे पुरातत्त्वीय आधारावर सिद्ध झालेले आहे. त्याअगोदर म्हणजे सिंधूपूर्वकाळात स्त्रीसत्तेत ही शेती ही हस्तश्रमाने (कुठल्याही प्रगत शेती अवजाराशिवाय हाताने केली जाणारी शेती)केली जात असे तीही अगदीच सीमित अश्या भागात म्हणजे जिथे केवळ नदीने अंथरलेल्या सुपीक गाळपेरात अगदीच आबोडधोबड असलेले प्राथमिक अवजारही सहज काम करू शकत असे अश्या ठिकाणी . नांगराच्या शोधाने नदीकाठी गाळपेराच्या क्षेत्रात अडकून पडलेल्या शेतजमीनची मर्यादा ओलांडली आता तिचे क्षेत्र केवळ नदिवृक्क शेतीपुरते न राहता ते विस्तीर्ण अश्या नदिखोऱ्यात पसरणे शक्य झाले ते बैलाच्या साह्याने अन् नांगराच्या शोधाने. स्त्रिसत्तेत शेती पिकवण्याची वा उत्पादकता वाढवण्याची जी माया होती तिचा मायिक आशयही आता निष्क्रिय झाला होता. नांगर चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या या बैलांना माणसाळवण्याचे काम हे स्त्रिसत्तेतील पुरुष वर्णाने ( गणार्धाने) केले. त्यामळे नांगराच्या शोधाबरोबर शेती हे उत्पादन साधन स्त्रीच्या हातचे जाऊन ते पुरुषांच्या हाती आले. म्हणजे सिंधोत्तर काळात लाकडी नांगराच्या शोधाने स्त्रीसत्तेच्या जागी मातृवंशक त्रैवर्ण्य राजर्षीसत्ता येवून शेती ही बैलाच्या साह्याने करणे सुरू झाले.स्त्रिसत्तेतील हस्तश्रमाच्या आणि केवळ गाळपेराच्या शेतीच्या तुलनेत नांगराच्या शोधाने बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या शेतीतून मिळणारे उत्पादन हे नदीवृक्क म्हणजे गाळपेराच्या हस्तश्रमाच्या तुलनेत वरकड म्हणजे दुप्पटीने होते. नदीवृक्क शेतीच्या तुलनेत नांगराच्या शोधामुळे विस्तीर्ण अश्या भूभागात शेतीचा विस्तार शक्य झाला. हस्तश्रमाच्या शेतीत सबंध गण हा केवळ काहीच क्षेत्र खेडू शकत असे त्याला क्षेत्राची, अन् उत्पादनाची मर्यादा होती मात्र बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या शेतीने ही मर्यादा संपुष्टात येवून अधिकचे क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य झाले. त्यामुळे एकूणच शेतीक्षेत्र आणि या शेतीत वरकड उत्पादन यामुळे गणाची भरभराट झाली, समृध्दी आली. सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणाला वेग मिळाला शेती, उद्योग, व्यापार ,कला स्थापत्य ह्यांचा अभूतपूर्व विकास झाला. भारताचा व्यापार हा जगाशी होऊ लागला इतकी समृध्दी सिंधू संस्कृतीने कमावली हे केवळ शक्य झाले बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या नांगराच्या शेतीमुळे ! मग सिंधूजनाच्या याच विकासाचे , समृध्दीचे बैल हा सिंबॉल बनला अन् सिंधू संस्कृतीच्या महत्त्वाच्या अश्या मुद्रेवर प्रतिबिंबित झाला.!!!!
बैलपोळा
आजच्या घडीलाही शेअर मार्केट मध्ये बाजारातील तेजी बैलाने निर्देशित करतात.!!
नांगराच्या शोधाने बैलाच्या साह्याने भौतिक समाजविकासक्रमातील कमी उत्पादक असलेला स्त्रीसत्ताक समाज जाऊन उत्पादन वाढी क्रांती झाली. उत्पादनाच्या वाढीतून सिंधुजनांनी व्यापार , कला, स्थापत्य यात अविश्वसनीय अशी प्रगती केली . ह्या विकासाचा, समृद्धीचा आधार होता बैलाच्या साह्याने केली जाणारी शेती त्यामुळे बैलाप्रती पूज्यभाव व्यक्त करणे हा सिंधूजनांचा समाजव्यवहार झाला. पण ही तत्कालीन भौतिक वास्तवता काही पिढ्यांच्या नंतर जाणिवेच्या पातळीवरून नेनिवेच्या पटलावर स्थिरावली अन् मग ती केवळ एका प्रथापरंपरेच्या स्वरुपात पिढीदरपिढी चालत आली. जेव्हा जाणिवेच्या पातळीवरची भौतिक वास्तवता नेनिवेच्या अंधारात गडप झाली तेव्हा भौतिक समृद्धीचा प्रतीक असलेल्या बैलांप्रतीचा पूज्यभाव नेनीवेच्या पातळीवरून जाणीव रूपात म्हणजे या बैलपोळा या सणाच्या .
आजही ह्या सणाच्या दिवशी ज्यांच्याकडे स्वतःचे बैल असतील तर ते त्याची पूजा करतात व ज्यांच्याकडे नसतील ते लोक चिखलाच्या मातीचे बैल करून त्यांची पूजा करतात.
बैलपोळा ह्या अब्राह्मणी कृषी संस्कृतीशी निगडित असलेल्या सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा !
साभार
भाऊराव अन्नपूर्णा बेंडे
ता. वसमत, जिल्हा हिंगोली
7499520294
हे पण वाचा
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 2
Malegaon protest – मालेगाव निषेध आंदोलन, 1
खालील links वर क्लिक करून आम्हाला फॉलो करायला विसरू नका
YouTube – Kanokan News
Instagram – Kanokan News
Facebook – Kanokan News
#डायलेक्टीकल_लॉजीक #अब्राह्मणी_सण_बैलपोळा
#ऐतिहासीक_बहुप्रवाही_भौतिकवादी_अन्वेषण_पद्धत #बैलपोळा #बैलपोळा_अर्थ
2 COMMENTS