malegaon protest – मालेगाव निषेध आंदोलन, 1
मालेगाव निषेध आंदोलन
मालवण येथील राजकोट किल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, पण अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमी, तसेच सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सरकारकडून चौकशी करण्यात येत असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शिवरायांनी 300 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले अजूनही शाबूत आहेत परंतु त्याच शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत याप्रसंगी महाराष्ट्रात अनेक शहरांत निषेध आंदोलने होत आहेत. अनेक शिवप्रेमी शिल्पकार जायदीप आपटेच्या घरीही पोहचले होते, पण जयदीप आपटे घरातून फरार असल्याची बातमी पोलिसांकडून देण्यात आली, शिल्पकार जायदीप आपटेचा शोध पोलिस प्रशासनकडून घेतला जात आहे.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेल्या 35 फूट छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.
याबाबत सखोल चौकशी करून संबंधित मूर्तिकार ,अधिकारी आणि प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी मालेगाव येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आले.
मालेगाव निषेध आंदोलनातील राजेंद्र भोसले यांचे मनोगत
1. ही कोण माणस आहेत जी सातत्याने जाणीवपूर्वक या राज्याच्या बद्दल कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी लिहीत असतात,
2. कोण हा आपटे आणि त्यावर प्रतिक्रिया देणारा कोण सहस्त्रबुद्धी तुम्ही काय लिहितात राजाच्या डोक्यावरती खून दाखवायची मजाल तुमची कशी झाली आजपर्यंत या देशातल्या कुठल्याही चित्रकाराने शिल्पकाराने या ठिकाणी केले नाही ते दाखवले तुम्ही म्हणता वाह काय डिटेल हा वारसा आम्हाला गुरुजनांकडून मिळाला अरेsss कोण गुरुजी कोण तुम्हाला शिकवतात
3. या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सचिवालय ज्या वेळेला हा पुतळा तयार केला जात होता त्यावेळेला ते कुठल्या साहित्य वाचत होते तलवार होती जी शिवरायांच्या मस्तकावरती लागली तो प्रसंग कोणता होता हे या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला सांगतील का असा प्रश्न राजेंद्र भोसले यांनी यावेळी उपस्थित केला.
4. जे जे पापी या पापात सामील आहेत या सगळ्यांवरती शासन व्हावे ज्याने महाराजांची खून दाखवली आणि त्याच्यावरती जो प्रतिक्रिया देतो या दोघांवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करावा ही मागणी राजेंद्र भोसले यांनी केला
राजेंद्र भोसलेंची संपूर्ण प्रतिक्रिया ऐकण्यासाठी – येथे क्लिक करा
मालेगाव निषेध आंदोलनातील अद्वय हिरे यांचे मनोगत
मालेगाव निषेध आंदोलनात या घटनेचा निषेध नोंदवत असतांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना अनेक मुद्द्यावर भाष्य केले.
पुढे, ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता त्याच विचारसरणीच्या लोकांनी हा पुतळा उभारला आणि तू जाणून बुजून पाडला हा केव्हा छत्रपती ब्राह्मण नाही तर तुमचा आमचा महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य सगळ्या जनतेचा अपमान आहे शिवरायांच्या राज्याभिषेका वेळी जी लोक आम्हाला सूत्र समजत होती तीही तीच लोक आम्हाला सूत्र समजत आहेत आणि म्हणून आमचं नेतृत्व कुठल्याही प्रकारे यांना मान्य नाही आज संदेश देण्यासाठी हा पुतळा पाडण्यात आला
असा आरोपही यावेळेस अद्वय हीरेंनी केला,
अद्वय अद्वय हीरेंच संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी – येथे क्लिक करा
मालेगाव निषेध आंदोलनातील अनिल पाटील यांचे मनोगत
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यावेळी बोलतांना सांस्कृतिक समजून घेण्याची विनंती सर्वांना केली
पुढे, महाराष्ट्रात किमान 50 शिल्पकार असे आहेत जे शिवरायांचे मोठ-मोठे व सुंदर शिल्प बनवू शकतात असे असताना जयदीप आपटे या 24 वर्षीय अनुभव नसलेल्या एका शिल्पकाराला महाराजांच्या पुतळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलाच कसा असा सवाल संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी सरकारला विचारला.
अनिल पाटील यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी – येथे क्लिक करा
मालेगाव निषेध आंदोलनातील अनिल पाटील यांचे मनोगत
जयदीप आपटे यांनी शिवरायांच्या आयुष्यात झालेला पहिला वार म्हणजे कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी केलेला तलवारीचा वार मालवणीतील दाखवला. यामुळे तीव्र शब्दात फिरोज भाई यांनी जयदीप आपटेचा निषेध केला निषेध केला. आणि जर जयदीप आपटे वर गुन्हा दाखल झाला नाही आणि त्याच्यावर कारवाई झाली नाही तर त्यांनी शिवरायांच्या माथ्यावर दाखवली तशी कोच ते यदि बापट्याच्या माथ्यावर पडल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा फिरोज भाई शेख यांनी केली
फिरोज भाई शेख यांचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी – येथे क्लिक करा
.
संबंधित ठेकेदारास अनुभव नसताना आणि महाराष्ट्रात प्रचंड अनुभव असलेले मूर्तिकार उपलब्ध असताना पुतळा बनवण्यासाठी कोणत्या निकषांवर देण्यात आला ?
पुतळा बनवल्यानंतर कोणत्या यंत्रणांनी पुतळ्याच्या गुणवत्ता आणि मजबुती बाबत अहवाल देवून मंजुरी दिली ?
यामागे नेमके कोणाचे हितसंबंध आहेत किंवा कुणाच्या आशीर्वादाने हे टेंडर काढण्यात आले ?
आपटे नामक मुर्तीकाराने अफजल खान वधाचा वेळी त्याचा वकील कृष्णा भास्कर छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील वार केलेला वार या मूर्तीत दाखवण्यात आला.
हे दाखव कोणती मानसिकता होती ?
याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पुतळा दुर्घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी दुर्दैवी गोष्ट आहे. पण त्याहूनही जास्त आपटे नामक मूर्तिकार आणि त्याच्या फेसबुकवर सहस्त्रबुद्धे नामक व्यक्तीने केलेली खोचक टिप्पणी ही महाराष्ट्रातील वर्ण वर्चस्ववादी मानसिकता दर्शवते आहे ही अतिशय शरमेची बाब आहे.
या सर्व बाबतीत सखोल चौकशी करावी यासाठी मालेगावी तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात मराठा सेवा संघ,मराठा महासंघ,संभाजी ब्रिगेड यासारख्या सामाजिक संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष, या राजकीय पक्षासोबत, साथी प्रतिष्टान, यासह असंख्य शिवप्रेमी या वेळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अद्वयआबा हिरे-पाटील, राजेंद्रभैय्या भोसले, प्रसादबापू हिरे, शिवश्री अनिल पाटील,पवन दादा ठाकरे, अमोल निकम,जगदीश खैरनार, हरिदादा निकम,सागर पाटील,शरद खैरनार,शेखर पगार,निखिल पवार,कैलास तीसगे,फिरोज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
साथी प्रतिष्ठान चे सदस्य व माजी सरपंच प्रकाश वाघ, ताउभैय्या परदेशी ,उमेशबापु अस्मर आणि सहकाऱ्यांनी आंदोलनात चळवळीची गाणी सादर केली.
संजय भाऊ महाले,प्रमोद शुक्ला,दीपक पवार,दीपक पाटील,राजाराम जाधव,संदीप पवार,जयेश अहिरे,निकेतन बच्छाव, भरत पाटील, प्रमोद शुक्ला, विनोद चव्हाण,विकी खैरनार, सोमनाथ खैरनार, वाय के खैरनार , शरद खैरनार, डॉ. आरूण पठाडे, दशरथ बापू निकम, नंदूकाका शिरोळे,सुधीर चव्हाण, नथुपंच खैरनार, नाना शेवाळे, मयूर वांद्रे,किशोर जाधव,जगदीश निकम,मनोज गोसावी,भैय्या पाटील,करण भोसले,दीपक बच्छाव,योगेश टेमरे,अनिल जाधव, अभिजीत सोनपसारे, योगेश कळमकर,रोहित बागुल,वैभव जगताप,गौरव शेलार, बिपिन बच्छाव दिनेश पाटील, पंढरीनाथ बोरकर,आदींसह हजारो शिवप्रेमी होते
हे पण नक्की पहा..
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 1
मराठे पुन्हा फसणार तर नाहीत ना ? मराठ्यांचे पानिपत होईल का ? भाग- 12